माहूर: कोरोना विषाणुच्या विळख्यातून मानव जातीची मुक्तता होण्यासाठी श्री देवदेवेश्वर मंदिरात नामस्मरण संपन्न.


माहूर दि २६ मार्च तालुका प्रतिनिधी – संपूर्ण जग कोरोना विषाणुच्या संसर्गाने त्रस्त आहे.मानव जातीवर आलेले हे संकट दूर होण्यासाठी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्री देवदेवेश्वर मंदिरावर दि.25 मार्च रोजी स.9 वा.विशेषाला मंगल स्नान घातल्या नंतर महंत प.पु.मधुकरबाबा शास्त्री कवीश्वर यांचे हस्ते विडा अर्पण करण्यात आला .त्यानंतर बाबांच्या उपस्थितीत गुढी उभारून नाम स्मरणास प्रारंभ करण्यात आला.
कोरोना विषाणुच्या दहशतीचे अख्ख्या जगावर सावट असून प्रत्येक नागरीक चिंताग्रस्त आहे.याही परिस्थितीत आपल्या जिवाची पर्वा न करता धीर गंभीरपणे आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या अधिकारी /कर्मचारी व सलग्न असलेल्या सर्वांचे ऋण व्यक्त करण्यासाठी देवदेवेश्वर मंदिराच्या भव्य प्रांगणात प्रदीपराजबाबा कपाटे व पंकजराजबाबा कपाटे (भडोच फाटा ) यांनी अथक 14 तास परिश्रम घेवून भव्य रांगोळी साकारली होती. अखिल मानव जातीचे कोरोना विषाणु पासून रक्षण व्हावे म्हणून आज नामस्मरण करण्यात आले. प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमा प्रमाणे प्रत्येकाने आपले आचरण ठेवावे. मानव जातीवर आलेले हे संकट ईश्वर निश्चितपणे निवारेल अशी सद्भावना प.पु.म.मधुकरबाबा शास्त्री कवीश्वर यांनी यावेळी व्यक्त केली.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!