हिमायतनगर: चालू स्थितीत गहू काढणी यंत्राला आग लागून यंत्र जळून खाक


हिमायतनगर दि.21 मार्च, तालुका प्रतिनिधी- हिमायतनगर शहरातून जाणार्‍या पळसपूर रस्त्याच्या कडेला गहू, हरभरा पिकाच्या काढणी झाल्यानंतर रस्त्यावर चालू स्थिती मध्ये असलेल्या हार्वेस्टरने दि.20 मार्च रोजी सायंकाळी 6 वा.अचानक पेट घेतल्याची घटना घडली असुन मुख्य रसस्त्यावर पेट घेतल्यामुळे तब्बल दोन तास वाहतुक ठ्प्प झाली होती.नगराध्यक्ष यांच्या दक्षतेमुळे आग्निशामका ने आग विजवण्यात यश आले आहे.
हिमायतनगर ते पळसपुर जाणा-र्या मुख्य रसस्त्यावर एका शेतक-र्यांच्या शेतातील गहू काढण्यासाठी तेलंगणातुन आलेल्या हार्वेस्टर दिवसभर काढला .गहू काढणी झाल्यानंतर सायंकाळी 6 वा.हार्वेस्टर परत येतांना मुख्य मार्गावर हार्वेस्टरच्या वायरींग मुळे अचानक आग लागली या आगीत हार्वेस्टर चालक बालंबाल बचावला आहे.
या आगीमुळे तब्बल दोन तास वाहतुक ठप्प झाली होती.सदरील घटनेची माहिती नगराध्यक्ष कुणाल राठोड यांना कळविताच त्यांनी आग्निशाम ची गाडी तात्काळ पाठवून सदरील आग विझविण्यात आली आहे. दरम्यान हे हार्वेस्टर जळून खाक झाले.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!