गंगाखेड: ब्राह्मण समाजाविषयी अपशब्द: उर्जा मंत्री डॉ.राऊतांच्या हाकालपटटीची महिला ब्राह्मण महासंघाची मागणी


गंगाखेड दि.19 मार्च, प्रतिनिधी- ब्राह्मण समाजाविषयी राज्याचे ऊर्जा मंत्री तथा नागपुरचे पालक मंत्री डॉ.नितिन राऊत यांनी अपशब्द वापरून संविधानाचा अपमान केल्या प्रकरणी त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करून त्यांना मंत्री पदावरून त्वरीत हटविण्याची मागणी गंगाखेड येथील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने तहसीलदार स्वरूप कंकाळ यांना निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते संजय सुपेकर, अ‍ॅड.राजेश कांदलगावकर, तालुका अध्यक्ष श्रीमती पदमजा कुलकर्णी, शहराध्यक्षा सौ.मंजुषा महाजन, सौ.योगिता पाठक, सौ.वैशाली बोरफळे, अ‍ॅड.स्मिता देशमुख, सौ.प्रज्ञा चौधरी, सौ.सारिका जोशी, डॉ.सौ.बागेश्री भरड, सौ.प्रज्ञा पाठक, सौ.निता भरड, सौ.सविता राखे, सौ.नेत्रा देशपांडे, सौ.स्वप्ना कोद्रीकर, सौ.वंदना अंबेकर, सौ.सुरेखा महाजन, कु.पुजा सराफ, सौ.गितांजली मंगरूळकर आदि संघटनेच्या महिला उपस्थित होत्या.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!