गो करोना: चिकन व अंडी मानवी आहारासाठी सुरक्षित; सोशल मीडियातील अफवावर विश्वास ठेवू नका


परभणी, दि. 13 :- कुक्कुट मांस व कुक्कुट उत्पादने यांचा नोव्हेल करोना विषाणुशी संबंध नसून ती आहारात पुर्णत: सुरक्षीत आहेत. तरी ग्राहकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विपर्यास केलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन परभणीचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले आहे.
कुक्कुट पक्षी व कोरोना विषाणुचा संबंध नसून कुक्कुट उत्पादने (चिकन, अंडी) मानवी आहारासाठी संपुर्णपणे सुरक्षित आहेत. याच्या सेवनामुळे कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होत नाही. नोव्हेल कोरोना विषाणु हा सांसर्गिक असून एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीस संक्रमीत होतो. कुक्कुट पक्षातील कोरोना विषाणु मानवामध्ये संक्रमीत होत नसल्याबाबत शास्त्रीय संदर्भ असून आपल्याकडे चिकन व मटन पुर्णत: उकळेपर्यत शिजवून सेवन केले जात असल्याने या तापमानात कुठलेही विषाणू जिवंत राहू शकत नाहीत.
चीन आणि इतर देशांमध्ये नोव्हेल कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूच्या संक्रमणाबाबत समाज माध्यमातून प्रसार होत असलेल्या चुकीच्या समजामुळे सामान्य नागरिकांत कुक्कुट मांस, अंडी व अन्य कुक्कुट उत्पादनाबद्दल गैरसमज निर्माण झाल्याने त्याचा विपरीत परिणाम कुक्कुट व्यवसायावर होत आहे. असेही जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून कळविण्यात आले आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!