हिमायतनगर: करोनाचा एक सशंयीत रुग्ण हिमायतनगर येथे देखरेखीखाली


हिमायतनगर दि.13 मार्च, तालुका प्रतिनिधी- सौदी अरेबीयातून भारतात आलेला व हिमायतनगर तालुक्यातील एका गावातील संशयीताला नांदेड येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते सदर रूग्णाला त्यांचा रिपोर्ट येई पर्यंत हिमायतनगर येथे गुरुवार दि. 12 रोजी येथील ग्रामीण रूणालयात डॉक्टराचा देखरेखी खाली ठेवण्यात आले आहे.
तालुक्यातील एक जन सौदी अरेबियात कामानिमित्त होता तो भारतात परताच कोरोनाचा सशंयीत असल्याने त्याला नांदेड येथील गुरु गोविंदसिंह शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते . दोन दिवसापूर्वी त्यांचे रक्ताचे नमूने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. जो पर्यंत त्याचा रिपोर्ट येणार नाही तो पर्यंत त्यांना येथील ग्रामीण रूणालयात आरोसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे अशी माहिती वैद्यकीय सूत्राकडून सांगण्यात आली आहे
तसेच नागरिकांनी अफवावर विश्वास ठेऊ नये असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. डि. डी. गायकवाड यांनी केले आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!