हिमायतनगर : लागवड केलेली झाडे संगोपन अभावी जात आहेत करपुन; शासनाचा कोट्यवधी रुपयांचा विकास निधी पाण्यात


हिमायतनगर दि.13 मार्च, तालुका प्रतिनिधी-हिमायतनगर तालुक्यासह सर्वञ शासनाने कोट्यावधी रुपयांचा विकास निधी खर्च करून मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड केली. ही वृक्ष लागवड फक्त फोटो पुरती मर्यादित राहिली असून लागवड केलेली रोपटे संगोपन वेळेवर होत नसल्याने वाळून जात आहेत. शासनाने ज्या उद्देशाने ही वृक्ष लागवड केली ते उद्देश साध्य होत नसल्याने शासनाचा वृक्ष लागवड करण्याकरिता नियोजित केलेला निधी अक्षरशः पाण्यात जात आहे.
महाराष्ट्र शासन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध उपाययोजना आखत आहे. यामध्ये वृक्ष लागवड महत्वपूर्ण ठरते. नैसर्गिक हानी भरून काढण्यासाठी शासनाने वृक्ष लागवडीचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. तत्कालीन सरकार मधील वन मंञी सुधीर मुनगंटीवार यांनी या उपक्रमाची चांगल्या प्रकारे सुरुवात केली. दरवर्षी कोट्यवधी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट घेवून ही योजना आखली गेली असून दरवर्षी या उपक्रमासाठी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी खर्च होत आहे. वृक्ष लागवड केलेली झाडे जगतच नसल्याने पुढे पाठ मागे सपाट अशी अवस्था या योजनेची झाली आहे. यामध्ये अधिकारी, कर्मचारी च नाहीतर बर्‍याच लोकांचे या योजनेच्या माध्यमातून चांगलेच चांग भले होत आहे. वर्षाकाठी 32 ,33 कोटी उद्दिष्ट ठेवून योजना पूर्ण करण्यापेक्षा एखादा कोटी पर्यंतचे उद्दिष्ट ठेवून लागवड केलेल्या रोपट्याची काळजी घेतली तर खर्‍या अर्थाने या योजनेचा मुळ उद्देश सफल ठरणार आहे. लागवड केलेल्या रोपट्याची काळजी घेण्या करिता संगोपनासाठी निधी ची तरतूद करणे आवश्यक ठरते. सामाजिक वनीकरण विभागा कडे तशी व्यवस्था आहे, परंतु इतरञ तशी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. शेजारील तेलंगणामध्ये वृक्ष लागवडी नंतर घेण्यात येणारी काळजी आपणासाठी खर्‍या अर्थाने प्रेरणादायी ठरते. या बाबीचा निश्चित पणाने विचार होणे गरजेचे असून लागवड केलेल्या वृक्षाची काळजी पुर्वक संगोपनासाठी उपाय योजना आखण्यात यावी. अशी मागणी पर्यावरण प्रेमी जनतेतून पूढे आली आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!