नायगाव -अनैतिक सबंधाच्या कारणावरून मिस्त्रीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; बरबडा येथील खळबळजनक घटना.


नायगावबाजार, दि.१ एप्रिल तालुका प्रतिनिधी – अनैतिक सबंधाच्या कारणा वरून बरबडा येथे एका घर बाधंकाम करणार्या मिस्त्रीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.या बाबत कुटूरं ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया चालू असल्याचे बिट प्रमुख सुवर्णकाळ यांनी प्रस्तुत प्रतिनिधीसी बोलताना सांगीतले.या स्त्री लंपड मिस्त्री ला या पुर्वी ही याच कारणा वरून गावात बेदम झोडपले होते.नंतर हे प्रकरण तडजोडी वर मिटवण्यात आले होते.
या संतापजनक घटना विषयी आधिक माहीती अशी की.बरबडा येथे घर बाधंकाम करण्यासाठी काही वर्षापुर्वी बरबडा येथे वास्तव्यास आलेल्या एका मिस्त्रीचे बरबडा गावातील महिलेशी अनैतिक संबंध निर्माण झाले होते.ते सबंध कायम रहावे म्हणून तो वारंवार या महिलेच्या घरी येत होता .
मंगळवारी तो या महिलेच्या घरी आला होता या महिलेस माझ्या सोबत चल म्हणून जोर जबरदस्ती करीत होता.असे कळते . या कारणा वरून या घरात वाद निर्माण झाला.तेवढ्यात आगीचा भडका उडाला. सदर मिस्त्री बचाव म्हणून ओरडत असल्याचे चित्र नागरिकास पहावयास मिळाले. या नंतर स्वत: आग वीजवून तो नांदेड रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला असून त्याने मला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार कुटूरं ठाण्यात नोंदविली आहे.त्याने स्वतःला जाळून घेतले की त्याला जाळण्याचा प्रयत्न केला गेला हे कळावयास मार्ग नाही.
सदर प्रकरण रहा दफा करण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न चालत असल्याने घटना मंगळवार ची असतानाही या प्रकरणी बुधवारी संध्याकाळी हे वृत्त लिहीत असताना गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. संबंधित ठाण्याच्या बिट प्रमुखासी संपर्क साधला असता कार्यवाही चालू असल्याचे सांगण्यात आले तर सपोनि पठाण हे उपलब्ध झाले नाहीत.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!