लोहा : लॉक डाउन काळात रस्त्यावर फिरणाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करा – तहसीलदार परळीकर यांचे आदेश


लोहा दि.३१ मार्च, तालुका प्रतिनिधी

जीवनावश्यक वस्तू खरेदी च्या नावाखाली लोहा शहरात समुहा समूहाने लोक रस्त्यावर फिरत आहेत उपजिल्हाधिकारी ,तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाची पायमल्ली केली जात आहे दवाखाना ,जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली लॉक डाऊन यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी दिले आहेत.
लोहा शहर मागील आठवड्यात लॉक डाऊन काळात रस्त्यावर भ्रमंती करणाऱ्यांना उपविभागीय अधिकारी पी एस बोरगावकर, तहसीलदार विठ्ठल परळीकर, नायब तहसीलदार राम बोरगावकर, नायब तहसीलदार विजय चव्हाण महसूल कर्मचाऱ्यांनी विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्यांना तसेच ‘पायी भटकंती करणाऱ्यांना दंडुक्याच्या प्रसाद दिला परंतु ‘…..हम नही सुधरेंगे’ ! चा प्रत्यय पुन्हा पुन्हा येतो आहे पोलीस निरीक्षक जायभाये व कर्मचारी रात्रंदिवस बंंदोबस्तात आहेेेत पण ज्यांना काम नाही असे बेकामी मात्र कोरोना साठी उपद्रवी ठरत आहेत
खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आमदार शामसुंदर शिंदे, माजी आमदार रोहिदास चव्हाण, उपनगराध्यक्ष केशवराव भोकरदन यांनी जाहीरपणे लोकांना घरात बसा…. फिरू नका… काळजी घ्या….असे आवाहन केले . पालिका प्रशासनाच्या वतीने लाऊडस्पीकरवर संपूर्ण शहरात करोनाबाबत खबरदारी घेण्याबाबत माहिती सांगण्यात येत आहे तरी भाजीपाला ,फळभाज्या, फळ विक्री च्या नावाखाली लोक शहरात फिरत आहेत.
जुन्या लोह्यात येणाऱ्या रस्त्यावर टोळकेच्या टोळके समूहाने बसत आहे काही जण जाणून बुजून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करीत आहेत अशाना तालुका व पोलीस प्रशासनाने कडक कार्यवाही करावी पोलीस निरीक्षक भागवत जायभाये त्यांचे पोलीस कर्मचारी लोकांना सांगून लागले आहे लोकांची मानसिकता…..आपणास होत नाही ?अशी बनली आहे. त्यामुळे त्वरित आणि कडक कार्यवाही आता अपेक्षित बनली आहे .
जिल्हाधिकारी डॉक्टर बिपिन इटनकर यांनी अनावश्यक वाहनावर येणाऱ्यांचे वाहन जप्ती व त्यावर पोलीस कार्यवाही करण्याचे निर्देश दिले यांची तहसीलदार परळीकर यांनी कडकपणे अंमलबजावणी करावी अन्यथा ह्यात रस्त्यावर निकामी फिरणार यामुळे हजारो शहरवासी यांचा जीव धोक्यात येणार आहे.

लोह्यात बॅरॅकेटिंग –नगर पालिका प्रशासनाने शहराच्या मुख्य रस्त्यावर बॅरेकेटिंग केले आहे त्यामुळे पोलीस ये -जा करणाऱ्यास चेक करून पाठवीत आहेत. मुख्याधिकारी डॉ किरण सुकलवाड यांनी शहराच्या सर्व भागात निर्जंतुकीकरण फवारणी सुरू केली आहे शिवाय जागोजागी रस्ते अडविले त्यामुळे विना कारण बाहेर फिरणाऱ्यांना पावबंध करण्यात आले आहे.

(संग्रहित छायाचित्र )

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!