नांदेड: संगीत शंकर दरबारच्या निमित्ताने कलाकारांना उत्तम संधीचे व्यासपिठ-ना. अशोकराव चव्हाण


संगीत शंकर दरबारचे कला रसिकांच्या उपस्थितीत पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन


नांदेड दि. 27 प्रतिनिधी- येथील यशवंत महाविद्यालय येथे डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दीच्या 16 वर्षानिमित्त संगीत शंकर दरबार च्या उदघाटनाचे आयोजन करण्यात आले होते. ना. अशोकराव चव्हाण यांनी या वेळी रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उदघाटन केेले. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर दिक्षाताई धबाले, आमदार अमर राजूरकर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार मोहन हंबर्डे, उपमहापौर सतीश देशमुख, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, माजी आमदार माजी आमदार वसंत चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, श्रेयजा चव्हाण, सुजया चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, यंदाचे वर्षे हे डॉ. शंकरराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्षे म्हणून साजरे केले जात आहे. आज डॉ. शंकरराव चव्हाण साहेबांची पुण्यतिथी आहे तर उद्या कुसूमताई चव्हाण यांची पुण्यतिथी आहे. त्यांचा जन्म दिवस 14 जुलैला मानला जातो. शंकरराव चव्हाण यांच्या स्मृती पित्यर्थ विविध कार्यक्रम होत आहेत. देशासह राज्यातील अनेक कलावंतांना त्यांची कला सादर करण्यासाठी निमंत्रित केले जाते. यातून कलाकारांच्या कलेला दाद देण्याचा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे. या कार्यक्रमाला सर्वांचे योगदान व सहकार्य मिळाले असून 16 व्या वर्षात आज पदार्पण झाले आहे. देशात व राज्यात डॉ. शंकरराव चव्हाण यांचा नेहमीच गौरव झालेला आहे. त्यांना राज्याचे नेतृत्व करण्याची संधी नांदेडकरांनी दिलेली आहे. त्यांच्या आठवणी आजही सर्वांच्या मनात कायम आहेत. डॉ. शंकरराव चव्हाण नसल्याची मनात नेहमी खंत असून त्यांना आवडणारे शास्त्रीय संगीतातील असलेली आवड ही या कार्यक्रमाचे त्यांच्या स्मृतीपित्यर्थ आयोजन केले जात आहे. डॉ. शंकरराव चव्हाण यांचे देशाचे गृहमंत्री व दोनदा राज्याचे मुख्यमंत्री पदासह विविध पदे भुषविले आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याप्रमाणे नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरात डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतीपित्यर्थ स्पर्धा परिक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, ग्रंथालय, वसतिगृह असलेले सुसज्ज संकुल सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
डॉ. शंकरराव चव्हाण यांच्यासह त्यांचे सहकारी कै. राजारामबापू पाटील, डॉ. रफीक झकेरिया, यशंवतराव मोहिते या सर्वांचे जन्मशताब्दी वर्षेही यावर्षी साजरी होत आहेत. मुंबई येथे 11 मार्च रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विधान भवनामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून या कार्यक्रमास सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी केले.
डॉ. शंकरराव चव्हाण साहेबांना ज्या-ज्या गोष्टी आवडत होत्या त्याची पूर्तता करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यात मराठवाड्यातील सिंचनाचे प्रश्न, तरुणांसाठी शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न राहतील.
सुरुवातील डॉ शंकरराव चव्हाण व सौ कुसुमताई शंकरराव चव्हाण यांच्या पुण्यस्मरणानिमित्त शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्यावतीने आयोजित संगीत शंकर दरबार कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. परभणी येथील नलिनी देशपांडे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.तर सुंदरी वादन कपिल जाधव व त्यांचा संच तर वीणा वादनात डॉ. जयंती कुमारेश यांचा कार्यक्रम पार पडला.
शेवटी पालकमंत्री श्री चव्हाण यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करुन आभार मानले. यावेळी संगीत क्षेत्रासह विविध मान्यवर, शारदा भवन शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, संगीत क्षेत्रात ज्यांना जीवनगौरव पुरस्कार प्राप्त नलिनताई देशपांडे, अनुराधाताई पाल, विविध कलावंत, राज्यातील विविध भागातून आलेले विविध मान्यवर आणि कला रसिक उपस्थित होते.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!