नांदेडला आजपासून ‘या’ सेवांच्या लॉकडाऊनचे निर्बंध हटले!


दुकांनाची वेळ सकाळी ९ ते रात्री ९ निश्चित

आठवडी बाजार, बैल बाजार केला सुरू

नांदेड, दि.१५: नांदेड जिल्ह्यात आज दि.१५ ऑक्टोंबरपासून खालील अतिरिक्त सेवा सुरू करण्यास जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी परवानगी दिली आहे. तसेच मागील आठ दिवसांपासून सुरू असलेला बाजारपेठ खुली ठेवण्याच्या वेळेतील संभ्रम दूर केला असून, ज्या दुकानांना परवानगी देण्यात आली, त्यांना आता आठवड्यातील सातही दिवस सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत दुकाने उघडी ठेवता येतील.त्यामुळे पूर्वी सायंकाळी ७ पर्यंत दिलेले आदेशही संपुष्टात आले आहे.
दि. १५ ऑक्टोंबरपासून परवानगी दिलेल्या सेवा पुढील प्रमाणे:

१) आठवडी बाजार
२) जनावरांचा बाजार
३) उद्याने/पार्क
४) मनोरंजन उद्देशासाठी खुले मैदान
५) तंत्रज्ञान अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या प्रयोगशाळा
६) औद्योगिक प्रदर्शने

  • इतर नियम व दिलेली परवानगी जशास तशी कायम आहे.
  • व्यायामशाळा उघडण्यास मात्र अद्याप परवानगी दिलेली नाही.
  • सोबत आदेशाची प्रत

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!