सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास सीबीआयकडे!

  • सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवीदिल्ली, दि.१९: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी हा निकाल दिला. त्याचबरोबर गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवून मुंबई पोलिसांनी सीबीआयला संपूर्ण सहकार्य करण्याचा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. महाराष्ट्राला सरकारलाही निकालाचे पालन करावे लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, मुंबई पोलिसांनी या प्रकरणात तपास नाही केवळ चौकशी केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांना मोठा झटका बसला आहे.

या प्रकरणी 11 ऑगस्टला युक्तिवाद आणि सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर 13 ऑगस्टपर्यंत सर्व पक्षकारांनी आपापली बाजू लेखी स्वरुपात संक्षिप्तरित्या मांडली होती. मग सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल सुरक्षित ठेवला होता. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निकाल दिला.

सुशांत सिंह राजपूत 14 जून रोजी मुंबईच्या वांद्र्यातील राहत्या घरी आत्महत्या केली होती. बिहारच्या पाटण्यात आपल्याविरोधात दाखल झालेला गुन्हा मुंबई पोलिसांकडे वर्ग करावा, अशी मागणी करत सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीनेही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

हा अन्यायाविरुद्धचा विजय : बिहारचे पोलीस महासंचालक
बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी मुंबई पोलिसांचा तपास आणि पाटण्याच्या एसपीना क्वॉरन्टाईन करण्यावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. मीडियाशी बोलताना ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने सिद्ध झाले आहे की, बिहार पोलिसांनी काहीही चुकीचे केलेले नाही. हा अन्यायाविरुद्धचा विजय आहे. मला विश्वास आहे की सुशांतला न्याय मिळेल. आमच्यावर अनेक आरोप झाले. आम्हाला तपास करु दिला नाही. पाटणा पोलीस सर्वकाही कायदेशीररित्या करत होते. बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर टीकाटिप्पणी करण्याची रिया चक्रवर्तीची लायकी नाही.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!