मुखेड : रामदास पाटील सुमठाणकर मित्र परिवाराच्या वतीने धान्याचे वाटप

मुखेड दि. 12 एप्रिल , तालुका प्रतिनिधी – कोरोना विषाणुचा संसर्ग होऊ नये यासाठी सरकारने लॉकडाऊन केल्याने अनेकांचे हाल होत आहेत. रोज मजुरी करावी तेंव्हा पोट भरावे अशी परिस्थिती अनेकांची आहे. ना धान्याचा साठा, ना पैसा , अनेकांना राहायला घर ही नाही अशा परिस्थितीत रामदास पाटील सुमठाणकर मित्र परिवाराच्या वतीने मुखेड येथे गरजु व्यक्तीस 100 धान्य किटचे वाटप करण्यात आले आहे.
रामदास पाटील हे सध्या हिंगोली येथे मुख्याधिकारी या पदावर आहेत. हिंगोली येथे त्यांनी लॉकडाऊनच्या काळात मोठे समाजकार्य करीत असुन अनेक गोर गरीबांस तेथे धान्य किट वाटप करीत आहेत. मुखेडमध्ये रामदास पाटील यांच्या मित्र परिवाराच्या वतीने हातावरचे पोट असणा­ऱ्या वंचित घटकातील नागरीकांना एक छोटासा मदतीचा हात दिला आहे. यात घरगुती किराणा सामानासह आठ दिवस पुरेल एवढे धान्य वाटप करण्यात आले आहे.
यावेळी नगरसेवक प्रा. विनोद आडेपवार, नगरसेवक शाम एमेकर, शेखर पाटील,सुरेश उत्तरवार,संजय कोडगीरे, बालाजी बामणे, माधव माधसवाड, संदिप मोटरगेकर, राम सावळेश्वर, ज्ञानेश्वर डोईजड, संजय वाघमारे, विनोद रोडगे,प्रमोद मदारीवाले, संदिप पोफळे, योगेश पाळेकर, नितिन टोकलवाड, धनंजय मुखेडकर, आकाश पोतदार, मारोती घाटे, पंकज गायकवाड, उध्दव पाटील वडजे,संतोष होनराव, श्रीकांत घोगरे, भाऊसाहेब गायकवाड,गजानन आकुलवाड,नरसप्पा मुखेडकर, पृथ्वीराज चौहाण, नागेश गोविंदवाड, माधव गोरे, सतिष गुडमेवाड, सोमनाथ स्वामी,श्रीशांत गोरलवाड, जगदीप गायकवाड, संतोष बनसोडे, बाळु कांबळे, नागसेन लोहाळे, निखिल कोेंडेकर यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले आहेत.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!