कंधार : महाराष्ट्र गणेश मंडळा कडुन चित्रांद्वारे कोरोनाची जनजागृती

कंधार, दि.१२ एप्रिल , तालुका प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंधार शहरातील महाराष्ट्र गणेश मंडळाने रस्त्यावर चित्र काढून त्या माध्यमातून जनजागृती केली आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना ‘कोई रोड पर ना निकले’ असा संदेश ही चित्रातुन दिला आहे.
शहरातील गवळी गल्ली येथील महाराष्ट्र गणेश मंडळा कडुन सामाजिक उपक्रम राबवले जातात. देशात हाहाकार माजवलेल्या कोरोना या रोगा बाबत जनजागृती करण्यासाठी ही या गणेश मंडळाने पुढाकार घेतला आहे. शहरातील सराफा लाईन येथील रस्त्यावर गणेश मंडळाचे गंगाप्रसाद यन्नावार, दिलीप बनसोडे, आनंद तपासे, प्रवीण बनसोडे, संदीप अग्रवाल, गणेश बनसोडे, शेखर वडजकर, निखिल बनसोड, मन्मथ सालमोटे, नामदेव बनसोडे, सुशील अलेगावकर, बालाजी आम्ले, विथ मुंनगीलवर, यश वाघमारे,गजानन तोडली यांनी बोलके चित्र काढून घरात राहूनच आपण हे युद्ध जिंकू शकतो असा संदेश गणेश मंडळाने दिला आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!