लोहा : एकही गरीब-गरजूवंत मदती पासून वंचित राहणार नाही – प्रवीण पाटील चिखलीकर

लोहा दि. १२ एप्रिल , तालुका प्रतिनिधी – कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. राज्यात आता एप्रिल महिन्याच्या शेवट पर्यंत लॉक डाऊन आहे .या काळात लोहा- कंधार मतदारसंघात अन्नधान्य मदती पासून एकही गरीब व गरजवंत वंचित राहणार नाही यांची काळजी घेण्यात येणार आहे.खा चिखलीकर व खा शृंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात भाजप कार्यकर्ते लोकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहेत असे प्रतिपादन जि प चे माजी आरोग्य सभापती युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांनी केले आहे
लोहा- कंधार मतदारसंघात गरीब – गरजवंताना जीवनावश्यक वस्तूंचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर व खा सुधाकर शृंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहे .लोहा शहरात प्रवीण पाटील चिखलीकर, नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, माजी नगराध्यक्ष किरण वटट्मवार, भाजप तालुका अध्यक्ष शरद पवार, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, नगरसेवक दता वाले, संदीप दमकोंडावार, नारायण येलरवाड, नबी शेख, बालाजी शेळके, केतन खिल्लारे, भास्कर पवार, अमोल व्यवहारे, डॉ मंगेश पाटील, श्याम गावंडे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश जोंधळे यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
लोहा शहरातील गरजुवंताला अन्नधान्य किट युवा नेते प्रवीण पाटील यांनी वाटप केली यात जीवनावश्यक वस्तूंच्या समावेश आहे. आता पर्यंत ५० हजार लोकां पर्यंत मदत पोहचली आहे .लोहा- कंधार मतदार संघात एकही गरीब व गरजूवंत मदतीपासून उपेक्षित राहणार नाही याची भाजप कार्यकर्ते काळजी घेत आहेत ..यावेळी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!