पूर्णा: भारतीय रेल्वे ने १० लाख पेक्षा जास्त गरजूंना ३१३ ठिकाणी वाटप केले निशुल्क अन्न


क्षेत्रीय रेल्वे, एन,जी. ओ .च्या मदतीने आर पी एफ आणि आई आर सी. टी सी. चे कौतुकास्पद कार्य

सय्यद कलीम

पूर्णा दि. ११ एप्रिल , कोविड -१९ विषाणूचा संसर्ग वाढल्याने उध्दभवलेल्या परिस्थितीत संपूर्ण देशात लॉक डाऊन सुरु आहे. भारतीय रेल्वे मध्ये गरजूंना शिजवलेले अन्न देण्याची इच्छा रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केली. दिनांक २८ मार्च पासून या निशुल्क अन्न वाटप योजनेची सुरुवात ५४१९ गरजूंना ५४ ठिकाणी अन्न वाटप करून सुरु झाली आणि त्याची व्याप्ती काल दिनांक १० एप्रिल पर्यंत ३१३ ठिकाणी १०.२ लाख गरजूंना अन्न वाटप करून सुरूच आहे.
या कामी आई.आर.सी. सी .टी. सी. (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिसम कॉर्पोरेशन) आपल्या बेस किचेन म्हणजेच आपल्या स्वयंपाक घरात अन्न बनवून आर. पी. एफ. , जि,आर. पी. तसेच कर्माशियल डिपार्टमेंट, , एन. जी. ओ. यांच्या मार्फत विविध रेल्वे स्थानकावर, तसेच रेल्वे च्या कार्यालयात काम करणाऱ्या तर काही ठिकाणी रेल्वे स्थानक परिसरातून बाहेर जाऊन गरजूंना अन्न वाटप करत आहे.
आई.आर.सी. टी. सी देशभर पसरलेल्या त्यांच्या बेस किचेन मधून जसे कि भुसावळ, मुंबई, पाटणा, सिकंदराबाद, दिल्ली, बेंगलोर, अहेमदाबाद, इत्यादी ठिकाणाहून हे कार्य दिवस रात्र करून भारतीय रेल्वे समाजा विषयी जागरूक असल्याचे कर्तव्य पार पाडत आहे.
आज पर्यंत जे दहा लाख गरजूंना जेवण दिले जात आहे त्यातील ६. ५ लाख लोकांचे जेवण आई.आर.सी. टी .सी. ने आपल्या निधीतून बनविले आहे तर २ लाख लोकांचे जेवण आर. पी. एफ. कर्मचाऱ्यांनी बनविले आहे आणि २ लाख लोकांचे जेवण एन. जी. ओ . तसेच इतर जणांनी मिळून बनविले आहे. तसेच आई. आर. सी. टी. सी. ने पंतप्रधान फंडा मध्ये २० कोटी रुपयांचे योगदान हि दिले आहे. तसेच इतर फंडा मधेही योगदान दिले आहे. आणि कोरोना च्या संकटावर मात करण्यात उभे आहेत.हे विशेष .

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!