पूर्णा : पालम तालुक्यात साडेचार लाखाची देशी दारूसह टेम्पो जप्त ; आरोपीला अटक


पूर्णा दि. ११ एप्रिल तालुका प्रतिनिधी – [ परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्ये यांचे पथकाने पालम तालुक्यातील देशी दारू अड्ड्यावर छापा मारून टेम्पो सहित दारूचा साठा जप्त केला . आरोपींना अटक करण्यात आली आहे .
परभणीचे पोलीस अधीक्षकांच्या पथकातील एपीआय पांचाळ यांनी पालम तालुक्यात टेम्पो मध्ये अवैध साडेचार लाखाची देशी दारू घेऊन जाताना पकडण्यात आले .
आरोपी विलास वाघमारे याचे विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. देशी दारू टेम्पो सहित जप्त करून पालम पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पालम येथील पोलिस करीत आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी येथील विशेष पथकातील एपीआय हणमंत पांचाळ,एएसआय कछवे, रेड्डी, घनसावंत, कांदे, भोरगे, चव्हाण यांनी केली.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!