कंधार : चोराने चोरली महिला पोलीस उप निरीक्षकाची शानदार बुलेट ; कंधार पोलीस विभागात खळबळ

कंधार दि.११ एप्रिल , तालुका प्रतिनिधी – पोलिसांच्या निष्क्रिय वृत्ती मुळे कंधार मध्ये चोरीच्या घटनांत दिवसे दिवस वाढ होत चालली आहे. बुधवारी बार फोडल्याची घटना ताजी असतानाच काल गुरुवारी दि.९ एप्रिल रोजी रात्री तर चक्क कंधार ठाण्यातील पोलीस उप निरीक्षक .पवार यांची बुलेट चोरी करून चोरट्यांनी कंधार पोलिसांना आव्हानच दिले आहे. कंधार शहरातील गजानन नगर मध्ये कांही दिवसा पूर्वी एकाच रात्री तीन घरे फोडून मोटार सायकल सह सोने, चांदी चोरी झाल्याची घटना घडली होती. त्याचा तपास थंड बसत्यात असतानाच दोन दिवसा पूर्वी बुधवारी इंद्रप्रस्थ बार फोडल्याची घटना घडली या प्रकरणात तपास तर सोडाच अद्याप गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला नाही. कंधार पोलिसांच्या या वृत्तीमुळेच चोरट्यांचे मनोधैर्य वाढत असुन निर्भीडपणे चोरटे आपले काम करीत आहेत.आता तर चक्क चोरट्यांनी महिला पोलिस अधिकाऱ्याची मोटार सायकल चोरी करण्या पर्यंत मजल मारली आहे. या घटनेतुन चोरट्यांनी चक्क कंधार पोलिसांना आव्हानच दिले आहे. कंधारच्या ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उप निरीक्षक .मनिषा पवार ह्या अभिनव नगर येथे किरायाने राहतात. नेहमी प्रमाणे त्यांनी आपली बुलेट गाडी घरा समोर उभी केली होती. दि.९ एप्रिल रोजी रात्री चोरट्यांनी घरा समोरील मोटार सायकल लंपास केली. मोटार सायकल चोरी गेल्याचे पवार मॅडम यांनी ठाण्यात सांगितल्या नंतर सकाळी कंधार पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली. वृत्त लिही पर्यंत पोलिसात कुठलीच कारवाई करण्यात आली नव्हती. अवैध धंदे असो की चोऱ्यांचे सत्र असो बघ्यांची भूमिका घेणारी कंधार पोलीस या प्रकरणात तरी आपले विशेष लक्ष देतील असे बोलल्या जात आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!