लोहा मतदार संघात खा.सुधाकर श्रंगारे गरजवंताच्या मदतीला येणार … !

प्रविण पाटील यांची माहिती.


लोहा दि.११ एप्रिल , तालुका प्रतिनिधी – कोविड 19 या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरात टाळेबंदी झाली संपूर्ण राज्य लॉक डाऊन आहे या काळात स्वतःचा मुलगा आजारी व संपूर्ण कुटुंबीय 14 एप्रिल पर्यंत होम क्वारंटाईन असतानाही लातूरचे खासदार सुधाकरराव श्रंगारे हे खासदार प्रताप पाटील चिखलीकर व जिल्हा तालुका प्रशासनाच्या संपर्कात आहेत त्यांच्या वतीने लवकरच लोहा कंधार भागात गरजवंतांना मदत दिली जाणार आहे अशी माहिती लोहा विधानसभा मतदारसंघाचे युवानेते प्रविण पाटील चिखलीकर यांनी दिली.
जिल्हा परिषदेचे माजी सभापती व मतदार संघाचे युवा नेतृत्व प्रवीण पाटील चिखलीकर यांनी सांगितले की विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाँकडाऊन करण्यात आली आहे या काळात जिल्हा तालुका प्रशासनाकडे जनतेच्या विविध अडीअडचणी साठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर पाठपुरावा करीत आहे तसेच खासदार सुधाकर शृंगारे करत आहे त्यांचा मुलगा आजारी आहे त्यांचं संपूर्ण कुटुंबीय 14 पर्यंत होम क्वारंटाईन आहेत अशा काळात ते सातत्याने खासदार चिखलीकर व प्रशासनाच्या संपर्कात आहेत लोहा कंधार तालुक्यातील पदाधिकारी तसेच पक्षाचे तालुकाध्यक्ष यांच्याशी त्यांचा संवाद सुरू आहे लोकांच्या अडीअडचणी सोडवत आहेत.
येत्या चार-पाच दिवसात खासदार श्रंगारे यांच्या वतीने गरजवंतांना अन्नधान्य व जीवनावश्यक किटचा पुरवठा केल्या जाणार आहे. जरी होम क्वारंटाईन असले तरी त्यांनी लोहा कंधार मतदार संघ वाऱ्यावर सोडला नाही तर कोणाच्या काळात कौटुंबिक अडचणीतून मार्ग काढत मतदारसंघाच्या अडीअडचणी साठी धावून येत आहेत असे नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांनी स्पष्ट केले.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!