बिलोलीत भाजीपाला खरेदीसाठी शेकडो नागरिकांचीहोत आहे गर्दी


पोलिस उतरले रस्त्यावर


बिलोली दि. ११ एप्रिल , तालुका प्रतिनिधी – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने वतीने सर्वञ संचार बंदी करण्यात येऊन सर्वांना सोशल डिस्टनिंगचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.बिलोलीत माञ भाजीपाला खरेदीसाठी सकाळच्या सुमारास शेकडो नागरिक रस्त्यावर येत आहेत.वारंवार सुचना देऊनही नागरिक ऐकत नसल्याने अखेर पोलिस कर्मचाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागून गर्दी कमी केली.
जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूचा भारतातही मोठ्या प्रमाणात प्रसार होत असून महाराष्ट्रात या विषाणूने प्रभावित झालेल्यांची संख्या हजाराच्या पार झाली आहे.राज्यातील बहूतांश जिल्ह्यासह बिलोली तालुक्याच्या सिमेलगत असलेल्या तेलंगणा राज्यातही या विषाणूने मोठ्या प्रमाणात पाय पसरायला सुरूवात केली आहे.या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शासनाच्या वतीने लागू करण्यात आलेल्या संचार बंदीची अमलबजावणी करण्यासाठी तहसिलदार,पोलिस निरिक्षक,नगर परिषद मुख्याधिकारी व त्यांचे कर्मचारी, नगराध्यक्षा चे प्रतिनिधी आणि काही नगरसेवक ,गट विकास अधिकारी यांच्यासह सर्व प्रशासकीय यंत्रणा दिवस राञ परिश्रम घेत आहे. संचार बंदीच्या काळात सवलत देण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे.सकाळी सात ते बारा वाजे पर्यंत नागरिकांना किराना व भाजीपाला खरेदीसाठी योग्य अंतर ठेवून बाहेर जाण्याची परवानगी आहे.बिलोली शहरातील हनुमान मंदिर कमान ते गांधी चौक मार्गावर सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदी करण्यासाठी शेकडो नागरिक रस्त्यावर येत असून भाजीपाला खरेदी करताना सोशल डिस्टंसीग ची पायमल्ली करत होते.याबाबत प्रशासनाच्या वतीने वारंवार सुचना देऊनही खरेदीसाठी आलेल्या नागरिकांकडून योग्य ते अंतर ठेवण्यात येत नसल्याने अखेर बिट जमादार माधव वाडेकर,न.प कर्मचारी रस्त्यावर उतरून विनापरवानगी बसलेल्या व्यापाऱ्यांना तेथून हटकले तर खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनाही मास्क वापरत योग्य अंतर ठेवण्याच्या सुचना केल्या.विशेष म्हणजे भाजीपाला विक्रीसाठी नगर परिषद व तहसिल कार्यालयाच्या वतीने पासेस देण्यात आले आहेत. या पासेसवर व्यापार कुठे करायचा हा ऊल्लेख नसल्याने हे व्यापारी बिनदिक्कत एकाच ठिकाणी गर्दी करत असून याबाबत पोलिसांनी विचारना केली असता पास दाखवत आहेत त्यामुळे पोलिसांचा नाईलाज होत आहे.शहरातील गल्ली बोळात फिरून भाजीपाला विक्री करत असताना एकाच ठिकाणी गोंधळ करण्याची गरज काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.नगर परिषद व तहसिल प्रशासनाने भाजीपाला व्यापाऱ्यांना व्यापार करण्यासाठी प्रत्येक गल्लीत ठिकाण ठरवून दिल्यास एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळली जाऊ शकते अशी सुचना नागरिक करत आहेत .

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!