पूर्णा: बाहेर गावाहून येणाऱ्यास गावात प्रवेश देऊ नका – तहसीलदारांचे आदेश


पूर्णा दि. ११ एप्रिल , तालुका प्रतिनिधी – आपल्या गावात बाहेर जिल्ह्याच्या कोणत्याही व्यक्तीस येऊ देऊ नये.चोरट्या मार्गाने जर कुणी मुंबई, पुणे,औरंगाबाद, लातूर किंवा इतर जिल्ह्यातून आपल्या गावात यानंतर आल्यास त्या व्यक्तींना गावात प्रवेश देऊ नये ,तात्काळ प्रशासनास कळवावे असे सक्त आदेशतहसीलदार पूर्णा यांनी तालुक्यातील सर्व सरपंच,पोलीस पाटील, तलाठी,ग्रामसेवक यांना काढले आहेत .या आधीच आपल्या तालुक्यात जवळपास 6 हजार लोक मुंबई,पुण्याहून आलेले आहेत त्यांचे आपण सर्वेक्षण ही केलेले आहे.परंतु चोरट्या मार्गाने अजूनही लोक इतर जिल्ह्यातून आपल्या तालुक्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.सुदैवाने आपल्या जिल्ह्यात/तालुक्यात कोरोना संसर्ग झालेला एकही रुग्ण नाही म्हणून आपण खबरदारी घेणे आवश्यक आहे.जर आपल्या गावात यानंतर एकही माणूस बाहेर जिल्ह्यातून आल्यास याची जबाबदारी आपणावर निश्चित केली जाईल, याची नोंद घ्यावी. असेही तहसीलदार यांनी स्पष्ट्पणे सूचित केले आहे

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!