लोहा : अभियंता क्षीरसागर धावले आडगाव च्या गरीब लोकांसाठी ; अन्नधान्य वाटप करून केले सत्कर्म


लोहा दि. ११ एप्रिल , तालुका प्रतिनिधी – सामाजिक बांधिलकी असणारे कुटुंब गावात नेहमीच या न त्या कारणास्तव गरजूंना मदत करीत असतात.त्याची जाहीर वाच्यता कधीही करीत नाहीत .लोह्या पासून सात किमी अंतरावरील आडगाव येथे सा. .बा. चे अभियंता संतोष भगवानराव क्षीरसागर यांनी आपल्या गावातील सर्वं गोरगरीब व गरजवंताला अन्नधान्य वाटप केले.गावचा भूमिपुत्र इंजिनीअर अडचणीच्या काळात मदतीला धावून आले
सेवानिवृत्त शिक्षक भगवानराव क्षीरसागर यांचे थोरले चिरंजीव सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता संतोष क्षीरसागर व धाकटे चिरंजीव माजी सरपंच मंगेश पाटील हे नेहमीच लोकांच्या सुख दुःखाला धावून जातात .दवाखाना असो की लग्न समारंभ तेथे मंगेश पाटील , इंजि संतोष पाटील गरजूच्या मदतीला धावतात
कोविड १९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता गावातील गोरगरीब मजुरदार यांची उपासमार होऊ नये यासाठी गावकऱ्यांच्या मदतीला इंजिनीअर संतोष क्षीरसागर व मंगेश पाटील हे बंधू धावून गेले त्यांनी घरपोच गरजुना अन्न धान्य वाटप केले पण हे करताना गाजावाजा केला नाही निरपेक्ष भावनेने ही केलेले दान आपल्या अडचणीत गावकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली यातच धन्यता होय असे अभियंता क्षीरसागर याना वाटते त्यांच्या या निर्हेतुक सहकार्य व गावाला केलेल्या मदती बद्दल गरीब व गरजवंत यांनी आभार मानले

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!