लोहा : भोसीकर परिवाराची सामाजीक बांधिलकी ; गरजू कुटुंबांना अन्नधान्य वाटप

लोहा दि ९ एप्रिल तालुका प्रतिनिधी- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशांमध्ये व राज्यांमध्ये लॉकडाउन करण्यात आल्यामुळे कामगार, बेरोजगार अशा कुटुंबांना राज्याचे बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण व नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध संस्था व दानशूर व्यक्तीने पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत कंधार येथे येथे माजी आमदार ईश्वरराव भोसीकर, जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर, सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. वर्षाताई भोसीकर यांनी कंधार/ लोहा विधानसभा मतदार संघात आता पर्यंत जवळपास तीनशे च्या वर गरजू कुटुंबाना अन्नधान्य,भाजीपाला वाटप केले व मदतीचा हात दिला.
काँग्रेस जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर यांनी विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंधार शहरातील पोलीस स्टेशन , बँक ऑफ इंडिया, व्यापारी, भाजीपाला विक्रेते, रिक्शा चालक,आदी लोकांना मास्क व हैंडवाश वाटप केले.
मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती शाखा कंधार येथील कारखान्यातील कामगारांवर उपासमारीची वेळ आली. त्यांना कंधार येथील कामगारांना खादी ग्रामोद्योग सचिव व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या वतीने अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
लॉकडाउन मुळे अनेक कामगारावर, हातावर पोट असलेल्या मजूरदारा वर उपासमारीची वेळ आली शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत भोसीकर दांपत्याने संजय भोसीकर व सौ.वर्षाताई भोसीकर यांनी कंधार शहरातील अनेक अशा गरजू कुटुंबांना तांदूळ दाळ भाजीपाला आदी स्वरूपात मदत केली
. महेश भोसीकर यांनी कंधार शहर व परिसरात मदत केली .संजय भोसीकर यांनी गरजू कुटुंबांना मदत करु असे जाहीर केले. जनतेने घाबरून न जाता आपल्या घरातच राहून सुरक्षित रहावे व आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवावे व कोरोना विषानुच्या संकटाचा प्रभावीपणे सामना करू या असे आवाहन भोसीकर दाम्पत्याच्या वतीने करण्यात आले आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!