मुखेड: आपत्ती निवारण सेवा समितीकडुन कोरोना संकटात मदत


मुखेड दि. ८ एप्रिल तालुका प्रतिनिधी -जागतिक महामारी बनलेला कोरोना व्हायरसच्या आपत्तीमुळे संपूर्ण जगावर संकट ओढवलेले आहे. या संकटात अनेक जणांवर उपासमारी वेळ आली आहे. मुखेड येथे ज्यांचे हातावर पोट आहे अशा लोकांच्या उदरनिर्वाहासाठी उपासमारीची वेळ आली आहे. असे व दिवस रात्र जनतेची सेवा करणारे पोलीस बांधव, रुग्णालयातील रुग्णांची सेवा करणारे कर्मचारी यांना अशा परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वआपत्ती निवारण सेवा समितीच्या वतीने दररोज गरजूंना मोफत डबे पुरवठा करण्यात येत आहेत.
या गरजूंसाठी 106 डबे बनवण्यात आले व दीपनगर मधून पोळ्या संकलन करण्यात आले. बनवलेल्या डब्यातून पोलीस स्टेशनला 20 डब्बे , सरकारी दवाखान्यात 30 डब्बे , भटक्या लोकांना 50 डब्बे, गुजराती प्रवासी 6 डब्बे, असे एकून 106 डब्बे पुरवण्यात आले. पोळी संकलन प्रा. डाॅ.स्वानंद मुखेडकर, प्राचार्य किशोरराव शिरुरकर, सुरेश काचावार, प्रा. विजय जाधव, अभिजीत देशमुख, पांडुरंग जोशी, सचिन बंडावार, श्रीमती आशालता सारंग मठपती, गोविंद लाकडे, संतोष महेंद्रकर, विजयप्रकाश भुतडा, उमाकांत जोशी, जयश्री दाभडकर पांडुरंग दिनकर, सौ.आश्विनी कुलकर्णी शिरुरकर, सौ. स्मिता मुखेडकर यांनी केले. भाजी बनवून देण्याचे काम शिक्षक परिषदेचे जिल्हा संपर्क प्रमुख- व्यंकट गंदपवाड व सौ. सुचिता गंदपवाड यांनी केले. या वाटपसाठी भगवान गुंडावार, शेखर पाटील, प्रमोद काचावार, स्वानंद मुखेडकर, योगेश पाळेकर, योगेश कोंडावार, अशोक चौधरी यांनी केले. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!