उमरी: लॉकडाऊनमुळे उमरी शहारात मुक्या जनावरांच्या चा- याचा प्रश्न गंभीर ; चारा पाणी सोय करण्याची मागणी


उमरी दि. ८ एप्रिल तालुका प्रतिनिधी – सध्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावमुळे शासनाने एकवीस दिवसाचे लोकडाऊन जाहीर केल्याने सर्वत्र बंदमुळे माणसासह शहरातील मुक्या मोकाट जनावरांच्या खाण्याचा प्रश्न गंभीर बनला असुन जनावरांनाही खाण्यासाठी कांहीच भेटत नसल्यामुळे मुके जनावरे भर उन्हाळ्यात उपाशी राहत असल्यामुळे सध्या गोरगरीबांना अन्यधान्य खिचडी वाटप होत आहे मात्र शहरातील जनावरांना समाजसेवी संघटनानी चारा कडबा व खल्ली व पाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी हौत आहे .
उमरी शहरात रोडवर फिरणा- या मोकाट मुक्या जनावरांची संख्या वीस ते पंचवीस च्या घरात असून सध्या संचारबंदी असल्यामुळे उमरी बाजार पेठ कडेकोटबंद आहे . भूकेने व्याकुळ असलेले शहरातील मोकाट जनावरे खायला कांहीच भेटत नसल्यामुळे रस्त्यावर पडलेले कैरीबैग, खराब वस्तु खात असुन उमरी येथील पप्पू सेठ बेताला यांनी टमाटे खरेदी करुन जनावरांना चारत आहे .गोर गरिबांना धान्य वाटप करताना विविध सेवा संघटनांनी व लोकांनी मुक्या जनावरांचाही विचार करुन जनावरांना चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे ऊन्हाळा सुरु असल्यामुळे सध्या जंगला मध्ये चारा पाणी संपल्यामुळे पशुपक्षी हे पाण्याच्या शोधात मानव वस्तीकडे येत आहे .

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!