माहूर : आपत्ती नियंत्रण कक्षाचे दोन शिक्षक गैरहजर; कार्यवाही प्रस्तावित


श्री क्षेत्र माहूर दि. ६ एप्रिल , तालुका प्रतिनिधी – कोव्हीड 19 मूळे तहसील कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष १ एप्रिल रोजी सुरु केले असून 14 तारखेपर्यंत सुरू राहणाऱ्या या कक्षात एकूण 42 शिक्षक आलटून पालटून काम करणार आहेत. नायब तहसीलदार व्हि,टि, गोविंदवार गट विकास अधिकारी विशालसिह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन कक्ष सांभाळणार आहेत
या आपत्ती व्यवस्थापन कक्षात सेवा बजावणाऱ्या शिक्षक बांधवांना वेळोवेळी वरिष्ठांकडुन येणारे आदेश तहसीलदार यांनी दिलेले आदेश नागरिकांकडून येणाऱ्या सूचना यासह विविध माहिती संकलीत करून तहसीलदार यांचे कडे द्यावयाची असून कक्षात एका शिप्ट मध्ये तीन शिक्षक असे 24 तासात 9 शिक्षक येथे हजर राहणार आहेत
कोरोना पासून बचावासाठी किंवा कोरोन्टाईन नागरिकांना ठेवण्यासाठी अनुसूचित जातीच्या गर्ल होस्टल मध्ये सुविधा करण्यात आली असून येथे २०० बेड तयार करण्यात आले आहेत यासाठी व तालुक्यातील होम कोरोन्टाईन करण्यात आलेल्या नागरिकांची माहिती या कक्षात उपलब्ध राहणार असून आपत्कालीन परिस्थिती साठी हा कक्ष तत्पर राहणार आहे
दि 6/4/2020 रोजी गट विकास अधिकारी विशालसिह चव्हाण यांनी व गट शिक्षणाधिकारी राजेंद्र रोटे यांनी 6 वाजून 30 मिनिटांनी तहसील कार्यालयातील कक्षात भेट दिली असता तीन शिक्षका पैकी नितीन खरवडे हे हजर होते तर बालाजी येरमे,सोपान सुर्यवंशी हे गैरहजर आढळून आले तर त्यांचे मोबाईल ही बंद आल्याने ग वि अ विशालसिह चव्हाण हे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 188 नुसार दोघांचा अहवाल तहसीलदार यांचेकडे सादर करणार आहे अशी माहिती चव्हाण यांनी दिली आहे

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!