किनाळा : सर्व साधारण कुटुंबातील वलियोद्दिन फारुखी यांचे कडून रोज तब्बल ३०० गरीब नागरिकांना अन्नदान


गेल्या आठ दिवसा पासून स्वखर्चाने अन्नदान

किनाळा दि. ५ एप्रिल , वार्ताहर – संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूची साथ असल्यामुळे देशात शासनाने लाँकडाऊन घोषित केले त्यामुळे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करनारे कित्येक सामन्य कुटंबातील नागरीकावर उपासमारीची वेळ आली असताना बिलोली तालुक्यातील सामान्य कुटंबातील सामजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करनारे पत्रकार वलियोदिन फारूकी यांनी ज्यांचा रोजगार केल्या शिवाय त्यांची चुल पेटत नाही अशा तब्बल 300 नागरिकांना गेल्या आठ दिवसापासून दररोज खिचडी पुरवठा करन्याचे कार्य करीत असल्याने त्यांच्या या आदर्श उपक्रमाचे जिल्हाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी फारूकी यांच्या कुटंबीयाचे स्वागत केले.
. कोरोना विषाणूच्या महामारी आजाराने देशातील अनेक नागरीक मोठ्या प्रमाणात भयभीत असताना शासनाच्या वतिने करण्यात येत असलेल्या अनेक निर्णयाचे स्वागत करीत सर्वच घटकातील व्यक्ती यास भरभरून प्रतिसाद देत आहेत.राज्याचा विचार केला तर दिवसेंदिवस या विषाणूची लागन झालेल्या व्यक्तीची संख्या वाढत आहे.अशा परिस्थितीत मुख्यत: ज्यांच पोट तळहातावर आहे अशा गोरगरीबांच्या पोटाचा प्रश्न निर्माण होऊ नये या साठी शासनाने दखल घेत मदतीची घोषणा केलेली आहे मात्र असे असले तरी बिलोली शहरातील कांही दानशुर व्यक्ती भुकेल्यांची भुक भागविण्यासाठी समोर आलेले आहेत विशेष म्हणजे त्यांच्या समवेत बिलोली शहरातील एका सर्वसाधारण कुटुंबातील वलियोद्दिन फारुखी आपल्या घरची जेमतेम परिस्थिती असतांना सुद्धा मी कांही समाजाचे देणे लागतो असे म्हणत याच शहरातील खरोखरच दैनंदिनचा रोजगार केल्या शिवाय घरची चुल पेटत नाही अशा गोरगरीब कुटुंबातील सुमारे 300 सदस्यांना दररोज नित्य नियमाने खिचडी देण्याची व्यवस्था करीत आहेत.ज्या ज्या वेळी शहरात कुठल्याही उत्सवाचे आयोजन करण्यात येते त्या त्या वेळी सार्वजनिक उत्सवात कसलाही जातीयभेदभाव मनात न येउदेता वलीभाई यांचा महत्वाचा सहभाग असतो.गेल्या आठ दिवसा पासून फारूखी यांचा हा उपक्रम चालू असून याची दखल खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी घेऊन वलियोद्दिन फारुखी यांच्या कुटुंबियांचे कौतुक केले आहे.
. वली यांनी वेळ प्रसंगी माझ्यावर कर्ज काढण्याची वेळ आली तरी चालेल पण मी कोरोनाचा नायनाट होई पर्यत माझ्या शहरातील दिन दुबाळ्यासाठी माझे कार्य चालुच ठेवनार असल्याचे सांगितले.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!