लोहा : ठाणे येथून आलेले ४३ हळदावासीय पोलिसांच्या ताब्यात; घरीच क्वारंटाईन


लोहा दि. ३ एप्रिल तालुका प्रतिनिधी – ठाणे शहरातून कंटेनर मधून हळदा ( ता कंधार) कडे येणाऱ्या 43 जणांना चेक पोस्ट आडगाव फाटा येथे लोहा
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले ग्रामीण रुग्णालयात त्याची तपासणी करण्यात आली व त्यांच्या गावी कंधार तालुक्यातील हाळदा येथे चौदा दिवस होम विलगीकरण राहण्याच्या सक्त आदेश देण्यात आले आहेत
शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जिल्हा ठाणे येथून एक कंटेनर कंधार तालुक्यातील हाळदा गावी 43 जणांना घेऊन जात होते लोहा पोलीस ठाण्याचे चेक पोस्ट आडगाव येथे सदरील कंटेनर आले तेव्हा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नागसेन हटकर,सपोउनि बालाजी शिंदे, पोकॉ माधव डफडे, पोकॉ दीपक गुट्टे, होमगार्ड नागेंद्र क्षीरसागर यांनी तपासणी केली असता ते ठाणे येथून आले व ते हाळदा( ता .कंधार) येथे स्वतः च्या घरी जात आहेत असे सांगण्यात आले .पोंलीस निरीक्षक भागवत जायभाये यांनी या सर्व 43 जणांना लोह्याच्या ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. तेथे त्या सर्वांची वैदयकीय तपासणी करण्यात आली. पो नि भागवत जायभाये , पो कॉ गिरे यासह कर्मचारी यांनी त्या सर्वांना घरीच क्वांरंटाईन करण्याचे निर्देश दिले आहेत त्या नंतर सर्वजण हाळदा येथे गेले आहेत .

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!