नरसी फाटा दि. ३ एप्रिल वार्ताहर – केंदं सरकार कडून देशात कोरोना चा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी देशात लाॅकडाऊन करण्यात आले तरी दररोज देशा सह राज्यात कोरोना चे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे जनतेत भितीचे वातावरण असुन जि.प.सदस्य माणिक लोहगावे यांच्या वतीने खबरदारी चा उपाय म्हणून नरसी गावात टॅक्टरच्या साह्याने जंतूनाशक फवारणी करण्यात आली .
कोरोना वायरसचे रूग्ण भारतासह राज्यात दिवसेंदिवस वाढत असुन सरकार कडून या वायरसला थांबविण्याचे अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत दररोज जनतेला वेगवेगळे आवाहन करण्यात येत आहेत.
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर दि ३ रोजी नायगाव तालुक्यातील नरसी येथे जि.प.सदस्य माणिक लोहगावे यांनी आपल्या स्वखर्चाने टॅक्टरच्या साह्याने नरसी येथे जंतू नाशक फवारणी केले यावेळी डाॅ.मोरे , स.पो.नि.सोमनाथ शिंदे , बालुसावकार मुगावकर यांच्या सह पत्रकार उपस्थिती होते