परभणी जिल्ह्यात कडकडीत बंद; मुस्लिमांनी शुक्रवारची नमाज केली घरीच अदा


पूर्णा दि. ३ एप्रिल तालुका प्रतिनिधी- परभणी शहरात आज शुक्रवार रोजी कडेकोट बंद ठेवण्यात आला होता .परभणीच्या पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून अनेक ठिकाणी नाकेबंदी करून मोटरसायकल व गाडी जाऊ नये म्हणून अनेक ठिकाणी बांबू द्वारे मार्ग बंद करण्यात आले . दोन चाकी वाहनावर कारवाई करण्यात आली. झिरो फाटा, चुडावा ,कालगाव, धानोरा मोत्या, ताडकळस मार्गावर बंद करण्यात आले. शुक्रवारी पंधरा दिवसानंतर परभणी जिल्ह्यात कडकडीत बंद करण्यात आले . रेल्वे टेशन, बस स्थानक, दर्गा रोड, जिंतूर नाका, पूर्णा रोड, पाथरी रोड, शिवाजी चौक, वसमत रोड याठिकाणी येणे जाणाऱ्यांना बंद झाले होते तसेच पूर्णा शहरात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला म्हणून मुस्लिम समाजाने शुक्रवारची नमाज मस्जिद मध्ये न जाता आपल्या आपल्या घरात अदा केली . परभणी जिल्ह्यातकोरोनाचे पेशंट अद्याप आढळून आले नाही अशी माहिती परभणी जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दिली आहे .

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!