मुखेड : मोफत धान्यवाटपात गैरप्रकार केल्यास परवाना रद्द करा.-कलंबरकर यांची मागणी.


मुखेड ३ एप्रिल तालुका प्रतिनिधी – .कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे, या काळात जनतेची उपासमार होऊ नये म्हणून नियमित मिळणाऱ्या धान्याव्यतिरिक्त अगाऊ धान्य मोफत मिळणार आहे मात्र यात दुकानदारांनी चालाखी करुन पैसे घेऊन धान्य वितरित केल्यास त्यांच्या वर कार्यवाही करून त्यांचा परवाना रद्द करावा अशी मागणी शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी तहसीलदार काशीनाथ पाटील यांचेकडे केली आहे.
सध्या राज्यात आणि देशात कोरोनाने थैमान घातले आहे.यावर प्रतिबंध म्हणून राज्य व केंद्र शासनाने कलम 144 अंतर्गत संचारबंदी-जमावबंदी लागू केली आहे.अशा परिस्थितीत ज्यांचा संसार रोजच्या कामावर चालतो,त्यांचे जगणे अवघड होऊ नये, त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून त्यांना मोफत धान्यवाटप करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.पूर्वी जेवढे धान्य मिळत होते,ते धान्य मिळणार आहे.त्यासाठी पूर्वी जी रक्कम होती,ती राहणार आहे. पण, नव्याने प्रत्येक व्यक्तीसाठी(मग त्या कुटुंबात किती व्यक्ती असतील त्यांना प्रत्येकी 5 किलो प्रमाणे) 5 किलो तांदूळ विनाशुल्क मिळणार आहे. यासाठी पैसे लागणार नाहीत.यामध्ये धान्य कमी देणे किंवा त्यासाठी पैसे घेणे असा प्रकार आढळून आल्यास त्यांचा परवाना रद्द करण्यात यावा किंवा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी तहसीलदार मुखेड यांच्याकडे केली आहे. याबाबत तहसीलदार म्हणाले की,शासनाकडून जे अतिरिक्त धान्यवाटप होणार आहे,त्यामध्ये गैरप्रकार आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात येईल व त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल. .

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!