बिलोली : सुलतानपूर (शिवसाईनगर) येथे तांदूळ डाळ आणि साबण वाटप…


ना टिव्ही , ना अँड्रॉइड मोबाइल…ना…घर न दार…यांचा कसा ताळेबंद…?

बिलोली दि. ३ एप्रिल तालुका प्रतिनिधी –
ज्यांच्या घरी आहेत दाणे तेथील कुत्रेही शहाणे …!
ज्यांच्या घरी नाही दाणे ती माणसे दिवाने…!!

या दिवाने (वेड्या) माणसासाठी शुक्रवार दिनांक 3 एप्रिल रोजी कोरोना विषयीचे प्राथमिक ज्ञान देण्यात आले. यावेळी प्रत्येकांना योग्य अंतर ठेवून संवाद साधण्याचा प्रयत्न झाला . या झोपडीत राहणाऱ्यांना ना घर…. ना दार….. ना टिव्ही … ना अँड्रॉइड मोबाइल…. अशी अवस्था या ठिकाणी दिसून आली.
अशांना कोरोना विषयीची माहिती देण्यात आली . गावाबाहेर न फिरण्याचे शिवाय बाहेरगावच्याना गावात न येऊ देण्याचा सल्ला यावेळी देण्यात आला.
गरीबाच्या झोपडीत जाऊन त्यांच्याशी त्यांच्या परिवाराच्या विषयीचे हितगूज करून, त्यांना तांदूळ डाळ आणि साबणाची वडी देण्यात आली.
भीक मागणाऱ्या आणि गल्लोगल्ली पिना …..काटे……. विकणाऱ्याच्याही परिवारातील मंडळींना भेटून त्यांना कोरोना विषयीची माहिती देण्यात आली. यात निवृत्त गटशिक्षणाधिकारी के पी सोने, बिलोलीचे सामाजिक कार्यकर्ते गोविंद मुंडकर अर्जापूर चे शिवाजीराव पोरडवार, सोने, सौ कोपुरवाड आदी सहभागी झाले होते

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!