उमरी : विविध समाजसेवक संघटनां च्या वतीने भटक्या समाजा च्या कुटुंबाना अन्न व भाजीपाला किटचे वाटप


उमरी दि. ३ एप्रिल तालुका प्रतिनिधी – सध्या कोरोना व्हायरसमुळे हजारो मजुर कामगारांचे काम बंद झाल्यामुळे हातावर पोट असलेल्या मजुरांना लॉक डाऊनमूळे उपासमारीची वेळ आली असुन उमरी शहरातील सामाजिक संघटना एकत्र येऊन माणुसकी जोपासत उमरी शहरातील गोरठा रोडवरील वॊटर फिल्टर समोरील भटक्या विमुक्त समाजाच्या पन्नास कुटुबाला उमरी शहरातील सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास अनंतवार ,आनिल दर्डा , गोविंद अट्टल विपूल सुखाडीया ,धीर दर्डा ,वसीम कुरेशी मित्र मंडळाच्या वतीने शहरातील गोरठा रस्त्यावर वास्तव्यास झोपडपट्टीत असलेल्या गरीब मजुर व कैकाडी व भटक्या सामाजातीलकुटुबाला तांदुळ ,गव्हाचे पीठ ,दाळ व भाजीपाला किटचे वाटप करण्यात आले . यावेळी उमरीचे नायब तहसीलदार राजेश लांडगे, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, पोलिस निरीक्षक अशोकराव अनंत्रे , नगरअध्यक्ष प्रविणभाऊ सारडा , आडत आसोशिएनचे अध्यक्ष अनिल दर्डा , न पाचे कार्नयालयीन आधिक्षक हमीद अंन्सारी , नगरसेवक ईश्वर सवई, श्रीनिवास अनंतवार, माजी नगरसेवक गोविंद अट्टल , गणेश मदने ,विष्णू पंडीत ,संचालक धीरज दर्डा, ,विपुल सुखाडीया , सचिन गंगासागरे बाबुराजा सेठ झंवर ,गणेश मदने , रामु तोष्णीवाल भारत सावळे ,वसिम कुरेशी , गौतम सोनफळे आदींची उपस्थिती होती .

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!