हिमायतनगर येथील “त्या” एकाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह


हिमायतनगर दि. ३ एप्रिल , तालुका प्रतिनिधी – दिल्ली येथे ‘तबलीकि जमात’ कार्यक्रमात सामील झालेल्या एकाचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने हिमायतनगरकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे .
दिल्ली येथे इजतेमा कार्यक्रमासाठी जाऊन आलेल्या एकाला बुधवार दि. 1 रोजी हिमायतनगर पोलीसांनी ताब्यात घेतले होते. सदर इसमाचा इजतेमा सहभागामुळे हिमायतनगर शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. आरोग्य विभागाने त्यास ग्रामीण रुग्णालयाच्या आयसुलेशन वार्ड मध्ये ठेवले होते. दुसर्‍या दिवशी त्यास नांदेड ला पाठवून त्याचा (swab testing )करायला पुणे येथे पाठविण्यात आले होते. या घटनेमुळे शहरवाशीयांची चांगलीच झोप उडाली होती. अखेर दि. 2 एप्रिल रोजी त्याचा टेस्टिंग अहवाल निगेटिव्ह आल्यांनी सर्वानीच सुटकेचा निःश्वास सोडला आहे. सद्यस्थितीत तो नांदेड येथे असून त्यास नांदेड येथून डिस्चार्ज मिळाल्यास किमान 14 दिवस वैद्यकीय टीमच्या निगराणी खाली ठेवण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डि. डी. गायकवाड यांनी सांगितले. नागरींकानी संयम ठेवून घराबाहेर पडू नये, प्रत्येकाने जबाबदारी चे भान ठेवून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार जाधव, मख्यधिकारी प्रियंका टोंगे, गटविकास अधिकारी सुहास कोरेगांवे, पोलिस निरीक्षक भगवान कांबळे, यांनी केले.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!