नरसी फाटा: घरा बाहेर पडु नका… प्रशासनाला सहकार्य करा – खा.चिखलीकर


नरसी फाटा दि. २ एप्रिल वार्ताहर -कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने संचार बंदी लागू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहानाला आपणाला प्रतिसाद द्यायचं आहे.त्यामुळे नागरिकांनी घरीच राहाणे गरजेचे असुन विनाकारण बाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले
ते नरसी तांडा येथे, श्रावण पाटील भिलवंडे यांनी स्वखर्चातून येथील मोलमजुरी करणा-या मजुरदार व गरीब असलेल्या जवळपास 75 कुंटुबाना जीवनावश्यक धान्याचे वाटप खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्रावण पाटील भिलवंडे , शिवराज पाटील होटाळकर , माणिकराव लोहगावे, आदि प्रमुख उपस्थितीत होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे खा.चिखलीकरांनी तालुका प्रशासनाचा आढावा घेतला व ग्रामीण भागातील परिस्थिती पाहणी केली. नायगाव-नरसी येथे त्यांनी भेटी दिल्या. व नरसी चौकात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस कर्मचारी यांच्यासाठी साॅनिटायझर व मास्क चे वाटप त्यांनी केले. त्यानंतर नरसीतांडा येथे श्रावण पाटील यांच्या वतीने देण्यात आलेल्या अन्यधान्याचे वाटप यावेळी करण्यात आले.
यावेळी तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ शिंदे, अशोक पाटील मुगावकर, शंकर पाटील कल्याण, मंडळ अधिकारी विजय जाधव,सरपंच प्रतिनिधी गजानन भिलवंडे, पोपा. इब्राहिम बेग पटेल, मोहन पाटील भिलवंडे, मारोतराव भिलवंडे, तलाठी शाम मुंडे, पत्रकार प्रल्हाद उमाटे, आदींची उपस्थिती होती.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लाँकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आज जवळपास दहा दिवसापासून सर्वञ किराणा दुकान वगळता इतर सर्व बाजारपेठ बंद आहेत सर्वच व्यवहार ठप्प असल्याने गोरगरिब, कामगार, मजुरदारांना संचारबंदीच्या काळात हाताला काम मिळत नसल्याने संसाराचा गाडा कसा हाकायचा असा प्रश्न उभा टाकला.
सध्या उदभवलेली परिस्थिती आणि सर्वच ठिकाणी लाॅकडाऊन असल्यामुळे ग्रामीण भागातील मजुरी करून पोट भरणा-या नागरिकांना मदत व्हावी म्हणून भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रावण पाटील भिलवंडे यांनी पुढाकार घेऊन कठीण काळात आपले दातृत्व दाखवून दिले आहे. नरसी तांडा येथील जवळपास 75 गोरगरिब कुंटुबियांना खा.चिखलीकर यांच्या हस्ते जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले.त्यामुळे तांड्यावरील हातावर पोट असणा-या नागरिकांना मोठी मदत झाली आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!