मुदखेड : महापारेषणचे उपव्यवस्थापक हणमंतराव अडबलवार सेवानिवृत्त

मुदखेड दि. २ एप्रिल तालुका प्रतिनिधी – जंगमवाडी नांदेड येथील महापारेषणच्या विभागीय कार्यालयात उपव्यवस्थापक (मा.स.) या पदी कार्यरत असणारे कार्यकुशल कर्मचारी हणमंतराव यमनाजी अडबलवार हे आपल्या प्रदीर्घ शासकीय सेवेनंतर दि.३१ मार्च रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत.
५ सप्टेंबर १९८५ मध्ये तत्कालीन विद्युत मंडळात त्यांनी परळी येथे लिपिक म्हणून आपल्या शासकीय सेवेस प्रारंभ केला.त्यानंतर नांदेड,परभणी,बिड जिल्हात त्यांनी उत्कृष्टपणे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपली सेवा बजावली.
महापारेषण मध्ये यंत्रचालक, तंत्रज्ञ याच्या नविन भरतीचे कामकाज,जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव पाठवणे,अनुकंपा धारक पात्र उमेदवारांना सेवेत सामावून घेण्याच्या कामासह सर्व कर्मचाऱ्यांचे भविष्य निवार्ह निधी नामनिर्देशन,पोलिस तपासणी, मराठी भाषा नोंदी करण्याचे काम आपल्या सेवा काळात त्यांनी प्रभावीपणे केले.
अडबलवार कुंटुबीय हे सुसंस्कृत असल्यामुळे त्यांची दोन मुले वैद्यकीय क्षेत्रात आहेत. डॅा.नितीन अडबलवार पशूवैद्यकीय अधिकारी तर दुसरा मुलगा डॅा.योगेश अडबलवार एमबीबीएस आहे.हणमंतराव अडबलवार यांचा मनमिळावू स्वभाव असून त्यांनी गरजू कर्मचाऱ्यांना सेवा काळात वेळोवेळी मदत केलेली आहे.
त्यांच्या सेवानिवृत्ती बद्दल औरंगाबाद येथील महापारेषणचे मुख्य अभियंता महेंद्र वाळके यांनी एका प्रशस्तीपत्राद्वारे त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गाैरव केला.
परळी येथील महापारेषणचे अधिक्षक अभियंता आर.पी.चव्हाण,अभियंता चंद्रप्रकाश देगलुरकर यांनी त्यांना सेवानिवृत्तीबद्दल शुभेच्छा दिल्या.
महापारेषण विभागीय कार्यालयातील कार्यकारी अभियंता माधव सोनकांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हणमंतराव आडबलवार यांना कार्यालयाच्या वतीने निरोप देण्यात आला.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!