धर्माबादेत कोरोनाचे दोन संशयित रुग्ण तपासणीसाठी नांदेडला रेफर ; दिल्लीच्या ”तबलीक ए जमात” कार्यक्रमात होते उपस्थित

(संग्रहित छायाचित्र)


धर्माबाद दि. २ एप्रिल तालुका प्रतिनिधी – तालुक्यातील येवती येथील रहिवासी व शहरातील गांधीनगर येथील रहिवासी या दोघांना कोरोना व्हायरसची लागन झाल्याच्या संशयावरून त्यांची आरोग्य तपासणी करून पुढील तपासणीसाठी नांदेड येथे पाठविण्यात आल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
दिल्ली येथे तबलीक ए जमात ,च्या धार्मिक कार्यक्रमात महाराष्ट्रासह अकरा राज्यातील ५ हजारांहून अधिक भाविक सहभागी झाले होते.सदरील कार्यक्रमास शहरातील गांधीनगर येथील एका युवकांनी हजेरी लावल्याचे उघडकीस आल्यामुळे शहरातील जनतेत एकच खळबळ उडाली होती.सदरील प्रकरणाची माहिती प्रशासनास मिळताच त्या युवकांशी संपर्क साधून येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.वेणूगोपाल पंडीत यांनी आरोग्य तपासणी केली आहे.सदरील घटनेची माहिती डॉ.पंडीत यांनी वरीष्ठांना दिले.तसेच तालुक्यातील येवती येथील ६० वर्षाचा प्रौढ व्यक्ती हा गेल्या अनेक दिवसांपासून बाहेरगावी होता.तो अचानक २० दिवसांनंतर गावात आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.व गावातील काही जणांनी आरोग्य तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला आहे.त्यामुळे सदरील दोन्ही संरक्षित कोरोनाच्या रुग्णांची आरोग्य तपासणी वैद्यकीय अधिकारी डॉ.वेणूगोपाल पंडीत यांनी केली आहे.सदरील तपासणी नंतर वरीष्ठांच्या सुचनेवरून त्या दोन संशयित रुग्णांना नांदेड येथे पुढील आरोग्य तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.परंतु दोन्ही संरक्षित रुग्णांना कोरोना व्हायरसचे कुठलेही लक्षणे आढळून आले नसल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.वेणूगोपाल पंडीत यांनी सांगितले आहे.शहरातील गांधीनगर मध्ये कोरोना व्हायरसचा संरक्षित रुग्ण आढळून आल्याची माहिती शहरात पसरताच जनतेत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.परंतु कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी येथील प्रशासन सज्ज असून नागरिकांनी घराच्या बाहेर येऊ नका,असे आवाहन करण्यात येत आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!