उमरी: किराणा दुकानदारांना योग्य दरात माल विक्री करण्याच्या प्रशासनाच्या सुचना


उमरी दि. २ एप्रिल तालुका प्रतिनिधी – उमरी शहरातील किराणा दुकान धारक हे किराणा मालाची मनमानी भाव लावुन विक्री करत असल्या च्या तक्रारी शहर व तालुक्यातील नागरिकांनी तहसीलदार माधवराव बोथीकर व मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्याकडे केल्या आहेत . ग्राहकांच्या तक्रारी आल्याने किराणा सामान योग्य दरात विक्री करण्याच्या सुचना तहसील व नगरपालिका प्रशासनाने दुकानदाराना दिल्या आहेत .
तहसीलदार माधवराव बोथीकर , नायब तहसीलदार राजेश लांडगे, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी आज शहरातील किराणा दुकानाना भेट देऊन लॉक डाऊन च्या काळात सामान्य व गोरगरीबांना वेठीस न धरता योग्य दरात माल विक्री करावा अन्यथा कारवाई करण्या च्या सुचना दुकानदारांना देण्यात आल्या यावेळी तहसीलदार माधवराव बोथीकर , नायब तहसीलदार राजेश लांडगे,मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, पोलिस निरीक्षक अशोकराव आनंत्रे , तालुका आरोग्य आधिकारी मोहन देवराये गट विकास अधिकारी अमोलकुमार अंदेलवार ,गणेश मदने , किराणा असोशिएन चे अध्यक्ष गणेश यम्मेवार , श्रीनिवास अनंतवार , विठ्ठल मुक्कावार आदी यावेळी उपस्थित हौते .

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!