मनोहर मोरे
किनाळा दि. २ एप्रिल – किनाळा तालुका बिलोली येथे असलेल्या महादेव मंदीराची यात्रा किनाळा, हिप्परगा माळ व धुप्पा या तिन्ही गावातील गावकर्यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात दरवर्षी भरवली जाते मात्र यावर्षी देशात कोरोना विषाणूच्या महामारी आजारानेमुळे शासनाने दि.14 एप्रिल पर्यंत संचारबंदीसह लाॅकडाउन केले असल्याने शासनाच्या नियमाचे उल्लंघन होउनये यासाठी दि. 8 एप्रिल रोजी होनारी महादेव मंदीर यात्रा रद्द करून यात्रेसाठी होणारा खर्च कोरोणाग्रस्त नागरिकांना देण्याचा किनाळा येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने निर्धार करून निर्णय घेण्यात आला असल्याने याची परिसरातील सर्व भाविक भक्ताने नोंद घ्यावे असे आवाहन केले आहे.
किनाळा तालुका बिलोली येथे असलेले महादेव मंदीर हे किनाळा,धुप्पा,हिप्परगा माळ या तीन गावाचे श्रध्दास्थान असून या तिन्ही गावाच्या वतीने भव्य यात्रेचे आयोजन करण्यात येथे किनाळा येथील महादेव मंदीर हे बिलोली देगलुर व मुखेड व नायगाव तालुक्यासह अन्य अनेक गावातील नागरीकाचे श्रध्दास्थान असून येथे श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात अनेक ठिकठिकाणचे भाविक मोठ्या संख्येने येत असतात.
किनाळा हिप्परगा व धुप्पा या तिनी गावाच्या वतीने दरवर्षी भव्य यात्रेचे आयोजन करून तिनी गावातुन महादेवाची पालकी काढुन सायंकाळी शेकडो महिलाच्या उपस्थितीत काढुन मंदिराच्या प्रांगनात आणली जात असे आणि महादेव मंदीर परिसरात सकाळी दहा वाजल्यापासून आम्ली करून महाप्रसादाचे आयोजन व दुपारी तीन वाजता भव्य कुस्त्याचे आयोजन करण्यात येत असत. या यात्रेसाठी तिनही गावातील महिलासह अनेक बाहेरगावच्या महिला यात्रेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहात असत. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दि.7एप्रिल रोजी सायंकाळी काढन्यात येणारी पालकी आणि दि.8 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता होणार्या आम्ली व महादेव मंदीर यात्रेनिमीत्य भरवण्यात येणारी यात्रा आणी होणार्या भव्य कुस्तीचे सामने रद्द करण्यात आले आहेत.
किनाळा येथे असलेल्या महादेव मंदीर यात्रे निमीत्य दरवर्षी येथील मंदिराच्या प्रांगनात आयोजित करण्यात येनारा आम्लीचा महप्रसादास घेन्यासाठी व भव्य कुस्त्यासाठी परिसरातील पहिलवान यात्रेकरू व भाविकभक्ताने मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात त्यामुळे यंदा होनारी महादेव मंदीर यांत्रा रद्द करून शासनाच्या आदेशानुसार संचारबंदी व लाॅकडाउनच्या काळात घराबाहेर कोणीही पडुनये होणारी गर्दी टाळण्यासाठी किनाळा येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व्यंकटराव पाटील शेळगावे,पोलिस पाटील राजू पाटील भोसले, सरपंच प्रतिनिधी रघुनाथ गायकवाड, माजी सरपंच जयवंतराव गायकवाड, बालाजी पाटील भोसले,रावसाहेब पाटील मोहीते,शिवाजी पाटील मोहीते,माधव पाटील वाघमारे,ईवराज पाटील भोसले, यादराव मोरे,शिवराम भत्ते,किशन पाटील भोसले आदिसह गावातील अन्य नागरीकानी यंदा होनारी यात्रा रद्द करण्यात आली असून यात्रेसाठी होणारा खर्च कोरोनाग्रस्तांसाठी देण्याचा निर्धार करण्यात आला असल्याचे आमच्या प्रतिनिधीस कळवले असून याची परिसरातीलसर्व भाविक भक्ताने नोंद घ्यावे असे आवाहन केले आहे.