भोकर : लाँकडाऊन मुळे शहरातील कामगार शेतीकामासाठी ग्रामीण भागाकडे


भोकर दि. १ एप्रिल , तालुका प्रतिनिधी – लाँकडाऊनमुळे भोकर बाजारपेठ बंद असल्याने विविध दुकानात काम करणारे अनेक कामगार शेतीकामासाठी ग्रामीण भागाकडे जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे .शेतीकामासाठी मजुराचा शोध घेणाऱ्या शेतकऱ्यांना या काळात चांगले दिवस आले असून मजूर मिळत असल्याने शेतातील हळद काढणीच्या कामाला गती आली आहे .
भोकर तालुक्यातील अनेक गावातील कामगार शहरातील कापड, जनरल स्टोअर्स, किराणा दुकानात कामासाठी आहेत. करोना व्हायरस ने जगभरात थैमान घातल्याने भारतात १४ एप्रिलपर्यत लाँक डाऊन करण्यात आले.हाताला काम नाही, दैनंदिन जीवनातील गरजा भागविण्यासाठी अनेक कामगार ग्रामीण भागातील शेतकऱ्याकडे कामाची मागणी करताना दिसत आहेत. सध्या ग्रामीण भागात हळद काढणीचे कामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. पुर्वी दिवसाला २५० रूपये मजूरी देवून ही शेतकऱ्यांना शेतीकामासाठी मजूर मिळत नव्हते.शेतकरी बाहेरगावच्या मजूरांना मागेल तेवढी मजूरी देवून ये-जा आणि खाण्याची व्यवस्था करून मजूर आणत होते. मात्र लाँकडाऊनमुळे आता परीस्थिती बदलली. शहरातील कामगार १५ ० रुपये दिवसाला मजूरी घेवून शेती कामे करीत आसल्याचे सांगण्यात आले.बहुतांश शेतकरी आपल्या शेतातील हळद काढणीकरीता सरीच्या गुत्ता पद्धतीने मजुरांना मजूरी देत आहेत . अल्प दरात मजूरदार उपलब्ध झाल्याने शेतातील कामे जलदगतीने होत आहेत.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!