अर्धापूर, दि.३१ ,मार्च , तालुका प्रतिनिधी –
तालुक्यात सर्व दूर वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे हळद, गहू व ज्वारी पिकांना याचा फटका बसला. वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील लाईट गुल झाली होती.
अर्धापूर शहरासह येळेगाव, पार्डी म. पिंपळगाव, लहान, कामठा, मालेगाव, लोणी, दाभड सह विविध गावात रात्री नऊ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. पावसाचे प्रमाण जरी कमी असले तरी जोराचा वारा सुटल्यामुळे केळी व उन्हाळी ज्वारीला याचा मोठा फटका बसला. सध्या हळद काढणी व शिजवणे सुरू आहे. तसेच शिवारातच हळद वाळवण्यासाठी ठेवलेली असल्यामुळे पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची हळद भिजली आहे.