नायब तहसीलदार कागडे यांची माहिती
ईश्वर पिन्नलवार
मुदखेड दि. ३० मार्च नांदेड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात गस्तीवर असताना दोन्ही तालुक्याच्या सिमेवर मुगट गावातील एका नाल्यात 3 बोटी लपवून ठेवलेल्या आढळल्या सदर बोटीच्या सहाय्याने नांदेड व मुदखेड तालुक्यातील गावांमध्ये रात्रीच्यावेळी वाळू उपसा होत होता व दिवसा या 3 बोटी मुगट गावातील नाल्यात लपवून ठेवण्यात येत होत्या दोन्ही तालुक्यातील महसूल पथके आज सकाळ पासून त्यांच्या मागावर होते. दुपारी 3 वाजता नांदेड तालुक्याच्या पथकाला या बोटी मुगट गावात सापडल्या,त्यांनी तात्काळ वरीष्ठांना याबाबत कळविले वरीष्ठांच्या आदेशानुसार जिलेटिन स्फोटके लावून सायंकाळी 6 वाजता नष्ट करण्यात आल्या.
ब्रामणवाडा , नागापुर, बोडार, वाडी, पुयडवाडी, आसणा, वासरी, शंकतीर्थ, आमदुरा, पिंपळगाव, पुणेगाव या परीसरात अवैध वाळू उपसा राजरोसपणे चालू आहे.
वरील कार्यवाही .जिल्हाधिकारी डॉ.श्री.विपीन ईटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण,तहसीलदार नांदेड डॉ.श्री.अरुण ज-हाड, नायब तहसीलदार.मुगाजी काकडे,.संजय नागमवाड,मंडळ अधिकारी . अनिरुध्द जोंधळे, कोंडीबा नागरवाड .गजानन नांदेडकर,.खुशाल घुगे,.हायुम पठाण, .कु-हाडे,तलाठी .माणिक बोधगिरे,.कैलास सुर्यवंशी,राहूल चव्हाण,कु.आकाश कांबळे,.रवि पल्लेवाड,वाहन चालक गजानन काळे,जहीरोद्दीन तसेच मुदखेड पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी पुर्णत्वास नेली आहे.
जिल्हाधिकारी यांनी अवैध वाळू उत्खनन करणा-या लोकांना मोठा दणका दिला आहे. व यापुढे ही अशीच कठोर कार्यवाही करण्यात येईल असे नायब तहसीलदार कागडे यांनी सांगितले