देगलूर: कोरोना बाधित रुग्णासाठी राजमुद्रा ग्रुप च्या वतीने 51 पिशव्या रक्तसंकलन


देगलूर दि. ३० मार्च तालुका प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोरोना बाधित रुग्णाला रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी येथील राजमुद्रा ग्रुप मित्रमंडळाने सामाजिक बांधिलकी जोपासत 51 पिशव्या रक्तसंकलन करून कोरोना च्या लढाईत खारीचा वाटा उचलल्याने या मित्र मंडळाचे सर्वेसर्वा अनिल बोनलावार व नरेंद्र कंतेवार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
संपूर्ण जगाला कोरोना विषाणूने हादरून सोडले आहे या पार्श्वभूमीवर जगात अनेक ठिकाणी लॉक डाऊन झाले आहे. अशा गंभीर परिस्थितीत कोरोना बाधित रुग्णाला रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी सामाजिक भान ठेवून येथील राजमुद्रा ग्रुप मित्र मंडळाच्या वतीने दिनांक 29 मार्च रोजी कंतेवार निवास येथे दुपारी एक वाजता आमदार रावसाहेब अंतापूरकर व सेवानिवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश कंतेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास अनेकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला . विशेष म्हणजे पहिल्यांदाच महिलांनी रक्तदान केले आहे त्यात धनश्री महाजन व शिरपेवार मॅडम यांचा योगदान आहे. या रक्तदान शिबिरात पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षकासह अन्य 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे त्यामुळे राजमुद्रा ग्रुप मित्र मंडळाच्या टीमना 51 पिशव्या रक्तसंकलन करण्यात यश आले आहे.
सदरील रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी देगलूर नगर परिषदेचे बांधकाम सभापती अनिल बोनलावर , नगरसेवक नरेंद्र कंतेवार, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष बालाजी पाटील देगावकर,अॅड. वीरेंद्र पाटील , योगेश ढगे, रवींद्र मोरे ,किशोर चंदावार, गंगाधर बाशेटवार, प्रवीण मंगनाळे, दिगंबर दाऊबे, शिवाजी बिराजदार आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहे

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!