माहूर : मुक्त संचार भोवला : बंदी असतानाही गावभर हुन्दडणाऱ्या चार होम कोरोन्टाईनला उचलले


घरात राहण्याच्या सूचना असतांना गावात फिरतांना आढळल्याने केली कार्यवाही

राज ठाकूर


श्री क्षेत्र माहूर दि. २९ मार्च , – माहूर तालुक्यातील खेडेगावात 2826 नोद असलेले नागरिक पुणे मुंबई सह परराज्यातुन आलेले असल्याने त्यांना घरात राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या असतानांहि काही नागरिक या सूचनांनुसार घरात किंवा शेतात जाऊन स्वतःला होम कोरोन्टाईन करून घेतले तर अनेक नागरिक या सूचना धाब्यावर बसवून मोकाट फिरत असल्याने नागरिकांनि गट विकास अधिकारी विशाल सिंह चव्हाण यांना दूरध्वनी वरून सुचना दिल्याने त्यांनी गावातील आपल्या कर्मचाऱ्यां कडून खात्री करून मौजे हिंगणी येथील दोन तर इवळेश्वर येथिल दोन आशा चार नागरिकांना उचलत माहुरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
माहूर शहरासह तालुक्यातील 92 गावात 2526 हजारावर नागरिक पुणे मुंबई आंध्रप्रदेश व इतर गावातून आलेले आहेत यांपैकी माहूर शहरात 81 तर तालुक्यात 2526 नागरिक आले असून या सर्वांच्या हातावर होम कोरोन्टाईन चा शिक्का मारून त्यांनी अजिबात घराबाहेर पडू नये आशा सक्त सूचना देण्यात आल्या होत्या या नागरिकांनि या सुचना गांभिर्याने न घेतल्याने ही कार्यवाही सुरू केल्याची माहिती गटविकास अधिकारी विशालसिह चव्हाण यांनी दिली
माहूर तालुक्यातील मौजे हिंगणी येथे 22 नागरिक तर इवळेश्वर येथे 35 नागरिक पुणे मुंबई हैदराबाद येथून आलेले होते त्यांची तपासणी करून त्यांना 15 दिवस घरी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या परंतु त्यापैकी काही नागरिक गावभर मोकाट फिरत असल्याने गावातील सुजाण नागरिक या प्रकरणी शंका उपस्थित करून प्रशासनाने या नागरिकांच्या मोकळे फिरण्यावर अंकुश ठेवावा अशी मागणी गावातील नागरिकांनी गटविकास अधिकारी यांचेकडे केली होती
त्यामुळे गटविकास अधिकारी विशालसिह चव्हाण यांनी वरिष्ठांच्या निर्देशानुसार प्रत्येक गावातील मोकाट फिरणाऱ्या नागरिकांची यादी तयार करून हिंगणी येथील दोन तर इवळेश्वर येथिल दोन नागरिकांना उचलण्यासाठी पथक तयार केले यामध्ये गटविकास अधिकारी चव्हाण नायब तहसीलदार व्ही टी गोविदवार मेश्राम होमगार्ड शेक गणी यांचेसह पत्रकार गजानन भारती अविनाश टनमने इलियास बावाणी यांचेसह 108 चे डॉक्टर कर्मचारी उपस्थित होते

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!