किनवट दि. २९ मार्च तालुका प्रतिनिधी – प्रचंड वेगाने जगभरात कोरोना पोहोचत असला, तरी त्याला वेळीच रोखणे हे आपल्या हाती आहे. केंद्र, राज्य सरकारच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाच्यावतीने दिलेल्या आदेशान्वये सर्व उपाय योजना करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या मागर्दशनाखाली किनवट तहसील कार्यालयात कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी केले आहे.
कोरोना (कोव्हीड- १९ ) च्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारच्या माहितीचे आदान -प्रदान करण्यासाठी तथा कोणत्याही शंका, प्रश्नांच्या निवारणासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गोकुंदा (किनवट ) येथील तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष ( कंट्रोल रूम ) स्थापन करण्यात आले आहे. तिथे चोवीस तास संपर्क अधिकारी उपलब्ध राहणार असून, त्यांचा संपर्क क्रमांक ( o२४६९-२२२००८) व ९६०७५९०२०४ हा व्हाट्स अॅप क्रमांक आहे. कोरोनाच्या अनुषंगाने कोणत्याही बाबींच्या निराकरणासाठी सर्व जनतेंनी संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी केले आहे..