कोरोना या जीवघेण्या रोगाला संपवण्यासाठी घरातच राहा -आमदार श्यामसुंदर शिंदे


कंधार, दि.२७ जगभरात अत्यंत कमी दिवसात कोरोना या महाभयंकर रोगाने थैमान घातले असून जगभरात या रोगाने हजारो लोकांचा जीव घेतला आहे अद्यापपर्यंत तरी या भयानक रोगावर रामबाण इलाज निघाला नसल्याने भारतासह जगभरात चिंतेचे वातावरण आहे. या जीवघेण्या रोगापासून सावध व सुरक्षित राहण्यासाठी स्वतः व आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य यांची काळजी घेणे देशातील प्रत्येक नागरिकांचे आद्य कर्तव्य असून यासाठी लोहा-कंधार मतदारसंघातील व नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी या रोगापासून बचाव करण्यासाठी आपल्या घरातच राहावे हाच या रोगाला नियंत्रित करण्याचा रामबाण इलाज असल्याचे आमदार शामसुंदर शिंदे म्हणाले.
                आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी कंधार व लोहा तहसील येथे भेट देऊन अन्न धान्याचा तुटवडा पडू नये व लोकांची हेळसांड होऊ नये म्हणून संपूर्ण आढावा घेतला. खबरदारीचा उपाय म्हणून सर्वाना काही कमी पडू नाही अश्या सूचनाही तहसील व पुरवठा विभागाला दिल्या. तसेच लोहा व कंधार येथील आरोग्य विभागाच्या आढावा यावेळी घेण्यात आला. आपला जिल्हा व मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशातील व राज्यातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये येणारे एकवीस दिवस प्रत्येक नागरिकांसाठी अति महत्वाचे आहेत. यासाठी मतदार संघातील प्रत्येक नागरिकांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. विनाकारण घराबाहेर निघू नये अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा येणारे एकवीस दिवसात आपले सहकार्य या जीवघेण्या रोगाला रोखण्यासाठी व नियंत्रित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने खबरदारी साठी व आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या सुरक्षेच्यादृष्टीने प्रत्येकाने आपापल्या घरातच राहावे व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे नम्र आवाहन आमदार शामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी लोहा-कंधार मतदारसंघातील जनतेस केले आहे.

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!