नांदेड : राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा : नांदेड कन्या आराधना चन्नावार ची राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड


नांदेड दि.11 मार्च, प्रतिनिधी- वाशीम येथे पार पडलेल्या सब ज्युनियर राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा आणि भंडारा येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय जूनियर धनुर्विद्या स्पर्धा या दोन्ही स्पर्धेत आराधना चन्नावार हिने नेत्रदीपक कामगिरी करत महाराष्ट्रातून दुसरी येत दोन्ही स्पर्धेत रौप्यपदक पटकावले रौप्यपदकासह तिने दोन्ही राष्ट्रीय स्पर्धेतही तिने सहभाग निश्चित केला आणि रिकर्व्ह प्रकारात तिने महाराष्ट्रात दबदबा निर्माण केला
तिच्या या यशाकरिता वृषाली जोगदंड, दिनेश उमरेकर ,प्रतिक थेटे (नाशिक )अमर जाधव (अमरावती)यांनी मार्गदर्शन केले तर तिच्या या नेत्रदीपक कामगिरी करिता भारतीय संघाचे सचिव प्रमोद चांदुरकर ,आर.बी.साळुंके , क्रीडा अधिकारी किशोर पाठक, बाबाराव नरवाडे, शिवाजी नरवाडे, आत्माराम शिंदे यांनी अभिनंदन केले . तिच्या यशाकरिता अरुणा चन्नावार आणि वेंकटेश चन्नावार यांनी परिश्रम घेतले

Share this news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!