नांदेड,दि.3 मार्च , प्रतिनिधी – कबीर क्रीडा मंडळाच्यावतीने मराठवाडाश्री शरिरसौष्ठव स्पर्धा शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात नुकतीच पार पडली. यात औरंगाबादच्या गणेश दुसारिया ‘मराठवाडाश्री’चा टायटल विजेता ठरला.
स्पर्धेचे उदघाटन नगरसेवक बापुराव गजभारे तर प्रमुख पाहुणे म्हणून महेंद्र पिंपळे, विजय सरपाते, मंगेश कदम, मनोज क्षीरसागर, फारूख , विठ्ठल पाटील डक , बंटी लांडगे यांची उपस्थिती होती. स्पर्धेचे हे सातवे वर्ष असून साहेबराव सोनकांबळे यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती.
मराठवाडाश्रीचा टायटल विजेता औरंगाबादचा गणेश दुसारियाला अकरा हजार रूपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली होती. 0 ते 55, 56 ते 60, 61 ते 65, 71 ते 75 आणि त्यावरिल वजनगटात असणार्या स्पर्धकांचे सहा गट होते. या स्पर्धेसाठी 75 हजारांचे रोख बक्षिसे देण्यात आली. पंच म्हणून लड्डू सिंग रावत, राजू सिंग सिद्धू व औरंगाबादचे कुतुब सय्यद, मिर्झा जफर खान, फझर अली, सतीश जेठवाल यांनी काम पाहिले. या कार्यक्रमासाठी राहूल घोडकर, गब्बर सोनवने, अमोल मोरे, सुजीत भंडारी, यासिन अहमद, महेश सुर्यवशी, सौरभ बेरजे, राजकुमार भेदेकर यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमास शहरातील युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.